राज ठाकरे - मुख्यमंत्री चर्चा मीडियासमोर?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पोलिसांनी अडिच तास ताब्य़ात घेतल्यानंतर सोडून देण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना फोन करून चर्चेचं आमंत्रण दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची घोषणा राज ठाकरेंनी केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 12, 2014, 05:22 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पोलिसांनी अडिच तास ताब्य़ात घेतल्यानंतर सोडून देण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना फोन करून चर्चेचं आमंत्रण दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची घोषणा राज ठाकरेंनी केलीय.
मात्र, यानिमित्तानं अनेक प्रश्न निर्माण झालेत. कारण अटी मान्य झाल्या तरच सरकारशी चर्चा करण्याची भाषा राज ठाकरेंनी केली होती. मुख्यमंत्र्यांनी मात्र त्यांच्या अटी फेटाळून लावल्या होत्या. मात्र, आज मुख्यमंत्र्यांनी फोन केल्यानंतर राज ठाकरेंनी आंदोलन मागे का घेतलं? असा प्रश्न निर्माण झालंय. तसंच राज ठाकरे उद्याची मुख्यमंत्र्यांशी होणारी चर्चा मीडियासमोर करणार का? असा सवालही उपस्थित करण्यात येतोय.
मनसेने काय कमावले? काय गमावले?
राज ठाकरेंच्या टोलविरोधी आंदोलनामुळं कोणी काय कमावलं आणि  कोणी काय गमावलं याची चर्चा आता सुरु झालीय. मनसे, सत्ताधारी, विरोधक आणि सर्वसामान्य जनता यांनी काय कमावलं? काय गमावलं? यावर एक नजर टाकूयात....
काय कमावलं  
* टोलचा मुद्दा ऐरणीवर आणला
* टोलप्रश्नाबाबत विरोधकांवर कुरघोडी केली
* पक्षाला नवा कार्यक्रम मिळाला
* माध्यमांमध्ये पक्षाची चर्चा हा राजकीय फायदाच
* राज्यव्यापी प्रश्नाकडे लक्ष वेधले
काय गमावलं
* चर्चाच करायची होती तर आंदोलन का केलं? अशी टीका
* आंदोलनानं नेमकं साधलं तरी काय? असा प्रश्न आता विचारला जातोय.
* पक्षाची ताकद दाखवण्यात अपयश आल्याचं चित्र

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.