मुंबई-गोवा महामार्गावर टोल होणार लागू

मुंबई-गोवा हाय-वेवर टोल लागू होणार आहे. या हायवेचं चौपदरीकरणानंतर हा टोल लागू करण्यात येणार आहे. 

Updated: May 22, 2015, 06:31 PM IST
मुंबई-गोवा महामार्गावर टोल होणार लागू  title=

मुंबई : मुंबई-गोवा हाय-वेवर टोल लागू होणार आहे. या हायवेचं चौपदरीकरणानंतर हा टोल लागू करण्यात येणार आहे. 

चौपदरीकरणाचं काम २०१७ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दिलीय. टोलला विरोध करणाऱ्या शिवसेनेनेही टोलच्या बाजुने भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

अतिरिक्त खर्च भरून काढण्यासाठी टोलचा पर्याय अवलंबणार असल्याचंही गिते यांनी नमूद केलंय. एका बाजुला राज्य सरकार महाराष्ट्र टोलमुक्त करण्याची घोषणा करत असताना दुस-या बाजुला नवे टोलनाके उभं करण्याची तयारीही सरकारनं चालवलीय. त्यामुळं टोलमुक्त महाराष्ट्र ही केवळ घोषणाच राहणार असल्याचं दिसतंय. 

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही टोल रद्द होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. टोल हा द्यावाच लागेल, अशी भूमिका गडकरी यांनी घेतली आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना सरकार जनतेची दिशाभूल करीत असल्याचे बोलले जात आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.