'हायवेवरील मद्यविक्री दुकाने बंद रहाणार, बार आणि रेस्ट्रॉरन्ट नाही'

३१ मार्चपर्यंत हायवेवरचे ५०० मीटर पर्यंतचे वाईन शॉप, बार बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. यावर अनेक राज्यांनी पिटीशन दाखल केल्या होत्या. याबाबतची पुढील सुनावणी २७ मार्चला होणार आहे.

Updated: Mar 25, 2017, 09:04 AM IST
'हायवेवरील मद्यविक्री दुकाने बंद रहाणार, बार आणि रेस्ट्रॉरन्ट नाही' title=

मुंबई : ३१ मार्चपर्यंत हायवेवरचे ५०० मीटर पर्यंतचे वाईन शॉप, बार बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. यावर अनेक राज्यांनी पिटीशन दाखल केल्या होत्या. याबाबतची पुढील सुनावणी २७ मार्चला होणार आहे.

एटर्नी जनरल ऑफ इंडिया यांनी अभ्यास करून जे मत आलं आहे त्यानुसार दारू शॉपसाठी हा कायदा लागू आहे. रेस्टोरेंट, बियर बार या बाबत कुठलंही मत नाही आहे. अशी माहिती उत्पादनशुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. राज्यात १३ हजार ६५० रेस्टोरेंट, बार, फाईव्ह स्टार हॉटेल आहेत त्यांना हा निर्णय लागू होत नाही. जे मद्य विक्री आत मध्ये करतात अशा बार, रेस्टोरेंट, हॉटेलला हा निर्णय लागू होत नाही. त्यामुळे ३ हजार कोटीचा महसूल मिळणार आहे. याप्रकरणी भाजपच्या खासदारांनी दबाव टाकला आहे का? असे विचारल्यावर दबाव नाही. कुणा एका पक्षाचा निर्णय नाही. 13 हजार 650 पैकी 9097 बंद पडले असते आता त्यांना हा निर्णय लागू होत नाही. मद्यविक्री दुकाने बंद रहाणार. बार रेस्ट्रॉरन्ट नाही असे बावनकुळे म्हणाले.