`एटीएम`मधून पैसे काढायचेत?... मग लवकरच काढा!

दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर काही नवी खरेदी करायचा प्लान असेल तर त्यासाठी लागणारे पैसे आत्ताच काढून ठेवा... कारण ऐन सणासुदीच्या काळात तुमचं एटीएम मशीन तुम्हाला दगा देऊ शकतं.

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर काही नवी खरेदी करायचा प्लान असेल तर त्यासाठी लागणारे पैसे आत्ताच काढून ठेवा... कारण ऐन सणासुदीच्या काळात तुमचं एटीएम मशीन तुम्हाला दगा देऊ शकतं. लॉजेस्टिक सपोर्ट देणाऱ्या कंपन्यांमध्ये गार्ड कमी असल्यानं ‘एटीएम’समोर कॅशचं संकट उभं राहिलंय. सणासुदीच्या काळात हे संकट आणखी वाढण्याची चिन्हं आहेत.
म्हणूनच पैशांसाठी एटीएम मशीनवर अवलंबून राहणाऱ्या ग्राहकांनो सावधान... दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर नवी महागडी खरेदी करायची असेल तर आताच बँकेतून पैसे काढून ठेवा. नाही तर ऐनवेळी पंचाईत होईल. कारण, एटीएम मशीनपर्यंत रक्कम पोहचवणाऱ्या कंपन्यांना सध्या सुरक्षा रक्षकांची कमतरता भासतेय. त्यातच सणांसाठी अनेक गार्ड आधीच सुट्ट्यांवर गेलेत. त्यामुळे एटीएम मशीन्समध्ये पैसे टाकण्याची फ्रिक्वेन्सी कमी झालीय. त्याचा फटका सामान्य ग्राहकांना बसू शकतो.

ज्या एटीएममध्ये दोन दिवसांमध्ये एकदा कॅश भरली जायची त्यांची फ्रिक्वेन्सी कमी होऊन ती पाच दिवस झालीय. याचाच अर्थ मशीन्समध्ये पाच दिवसांनी एकदाच पैसे भरले जात आहेत आणि आता ही फ्रिक्वेन्सी अजूनच कमी होण्याची चिन्हं आहेत. महत्त्वाचं म्हणजे एटीएममधून दररोज पंधरा हजार कोटींचं ट्रान्झॅक्शन होतं.

एटीएम मशीन्सपर्यंत कॅश पोहचवणाऱ्या कंपन्या आपल्या व्हॅनच्या आणि कॅशच्या सुरक्षेसाठी पर्सनल गार्ड ठेवतात. सणांच्या काळात अनेक गार्ड सुट्ट्यांवर गेल्याने ही फ्रिक्वेन्सी कमी होणार आहे. देशात एक लाखांपेक्षा जास्त एटीएम आहेत. लगतच्या काळात एटीएमसाठी कॅश पोहचवणाऱ्या अनेक गाड्यांवर हल्ले करुन त्या लुटण्याचे प्रकार घडलेत. त्यामुळे कमी गार्डसच्या समस्या असलेल्या या लॉजिस्टिक कंपन्या रिस्क घेण्याच्या मुडमध्ये नाहीत आणि या सर्वांचा फटका तुम्हाला एटीएम वापरताना होणार हे नक्कीच...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.