विना हेल्मेट तरुणाने मारहाण केलेले वाहतूक पोलीस विलास शिंदे यांचे निधन

वाहतूक पोलीस विलास शिेदे यांचे आज दुपारी निधन झाले.  त्यांना लाकडी दांड्यांने बेदम मारहाण केली होती.

Updated: Aug 31, 2016, 03:12 PM IST
विना हेल्मेट तरुणाने मारहाण केलेले वाहतूक पोलीस विलास शिंदे यांचे निधन title=

मुंबई : वाहतूक पोलीस विलास शिेदे यांचे आज दुपारी निधन झाले. विलास शिंदे यांनी विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला अडविले. त्यावेळी या मुलांने त्यांना लाकडी दांड्यांने बेदम मारहाण केली होती.

खारमध्ये त्यांना मारहाण करण्यात आली होती. गंभीर जखमी झालेले वाहतूक पोलीस विलास शिंदे यांच्यावर मुंबईच्या लीलावती रूग्णालयात उपचार सुरू होते. पेट्रोलपंपांवर उभे राहून वाहनांची माहिती घेत शिंदे यांना मारहाण करण्यात आली होती.

डोक्यात अंतर्गत रक्तस्राव झाल्याने ते कोमामध्ये गेले होते. २३ ऑगस्ट रोजी शिंदे यांना मारहाण करण्यात आली होती. तेव्हापासून ते रूग्णालयात मृत्युशी झुंज देत होते. मात्र, त्यांची ही झुंज अपयशी ठरली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल रूग्णालयात जाऊन त्यांची भेटही घेतली होती. पोलिसांना अशाप्रकारे मारहाण करण्याच्या मुद्द्याविषयी राज ठाकरे यांनी संतापही व्यक्त केला होता.