तीन नवऱ्यांना फसवणाऱ्या महिला 'लखोबा'चं बिंग फुटलं!

तिला महिलांमधला 'लखोबा लोखंडे' म्हणावं लागेल. कारण तिनं तिघांना फसवलं. पण तिसरा नवरा हुशार असल्यानं त्यानं थेट पोलीस ठाणे गाठले आणि तिचं बिगं फुटलं. येवढंच नाही तर पोलीस अधिकारी असल्याचं सांगूनही तिनं अनेक लोकांना फसवलंय. 

Updated: Dec 16, 2016, 03:07 PM IST
तीन नवऱ्यांना फसवणाऱ्या महिला 'लखोबा'चं बिंग फुटलं! title=

स्वाती नाईक, नवी मुंबई : तिला महिलांमधला 'लखोबा लोखंडे' म्हणावं लागेल. कारण तिनं तिघांना फसवलं. पण तिसरा नवरा हुशार असल्यानं त्यानं थेट पोलीस ठाणे गाठले आणि तिचं बिगं फुटलं. येवढंच नाही तर पोलीस अधिकारी असल्याचं सांगूनही तिनं अनेक लोकांना फसवलंय. 

ही महिला स्वत:ला पोलीस अधिकारी असल्याचं सांगून लोकांना फसवायची... एव्हढंच नाही तर तिनं आजवर तीन लग्नही केलीत. भक्ती उर्फ सारिका शिंदे असं तिचं नाव...

२००९ साली पोलीस खात्यात भरती झाल्याचं ती सांगायची. महाराष्ट्र पोलिसांचं बनावट ओळखपत्रही तिच्याकडे होतं. ९९ साली तिनं पहिलं लग्न केलं. तिला १६ आणि १२ वर्षांची दोन मुलंही आहेत. 

त्यानंतर २०१३ साली कल्याणमधल्या एका इसमाशी तिनं दुसरं लग्न केलं. पण त्या इसमानं फसवणूक झाल्याचं कळताच तिच्याशी घटस्फोट घेतला. त्यानंतर भक्तीनं फेसबुकला आपलं साधन बनवलं... 

त्या माध्यमातून नवी मुंबईतल्या प्रदीप म्हात्रे यांच्याशी २०१६ साली लग्न केलं. यावेळी राजकारण्यांसोबतचे फोटो तिनं तिच्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केले होते. कालांतरानं प्रदीपला तिच्यावर संशय आला. त्यानं कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार केली. सारिका तोतया पोलीस असल्याचं समोरं आलं. 

पोलिसांनी सारिकाला ताब्यात घेतलंय, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक सतीश गायकवाड यांनी दिलीय. प्रदीपला संशय आल्यामुळे सारिकाचं बिंग फुटलं नाहीतर तिनं आणखी किती जणांना फसवलं असतं कुणास ठाऊक... पण प्रदिपच्या हुशारीने सारिकाचे भविष्यातले सर्वच प्लॅन फसले.