आईच्या नावाला आता प्राधान्य

राज्याचं महिला धोरण आज महिला दिनी जाहीर होणार आहे. यात अनेक ठोस उपाययोजना करण्यात आल्यात. यात महिलांना मालमत्तांमध्ये समान हक्क मिळणार आहेत. मालमत्तेमध्ये महिलांचं नाव लावणं आता बंधनकारक असणार आहे.

www.24taas.com,मुंबई
राज्याचं महिला धोरण आज महिला दिनी जाहीर होणार आहे. यात अनेक ठोस उपाययोजना करण्यात आल्यात. यात महिलांना मालमत्तांमध्ये समान हक्क मिळणार आहेत. मालमत्तेमध्ये महिलांचं नाव लावणं आता बंधनकारक असणार आहे.
अर्जात वडिलांच्या नावाबरोबरच आईचे नावही लावता येईल. सर्व अर्जांत तशा प्रकारचा उल्लेख करण्यात येणार आहे. तमाशा आणि लोककलांवत महिलांना 40 वर्षांनंतर निवृत्तीवेतन मिळणार असून महिला कलावंतांच्या मुलांसाठी आश्रमशाळाही सुरु करण्यात येणार आहेत.
देवदासी महिलांना घरकुल मिळणार आहे. तसचं तृतीयपंथियांचा यावेळी पहिल्यांदाच महिला धोरणात समावेश करण्यात आलाय. त्यांच्यासाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे.