मुंबई पालिकेत तरुण नगरसेवक, 42 टक्के उच्चशिक्षित

महापालिकेत निवडून आलेल्या 227 नगरसेवकांपैकी 8 टक्के म्हणजेच 18 नगरसेवक हे 30 वर्षाहून कमी वयाचे असल्याचे समोर आले आहे. तर एकूण सरासरी वय हे 45 वर्ष आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 25, 2017, 09:37 AM IST
मुंबई पालिकेत तरुण नगरसेवक, 42 टक्के उच्चशिक्षित title=

मुंबई : महापालिकेत निवडून आलेल्या 227 नगरसेवकांपैकी 8 टक्के म्हणजेच 18 नगरसेवक हे 30 वर्षाहून कमी वयाचे असल्याचे समोर आले आहे. तर एकूण सरासरी वय हे 45 वर्ष आहे.

कमी शिक्षण असलेले नगरसेवक

मुंबईतल्या नवीन नगरसेवकांपैकी 42 टक्के नगरसेवक हे उच्चशिक्षित तर 17 टक्के म्हणजेच जवळपास 38 नगरसेवकांचं शिक्षण दहावीपेक्षा कमी असल्याचे समोर आले आहे.

धनवान नगरसेवक

मुंबई महापालिकेत 690 कोटी संपत्ती असलेले भाजप नगरसेवक पराग शाह निवडून आलेत. त्यांची संपत्ती वगळल्यास पालिकेतील नगरसेवकांची सरासरी संपत्ती 3.51 कोटी इतकी आहे. यांत 31 टक्के म्हणजेच जवळपास 70 नगरसेवकांची संपत्ती ही 3 कोटींहून अधिक आहे.