सेल्फी डिलीट न केल्याने तरुणीची आत्महत्या

हल्ली कोणत्या ना कोणत्या कारणाने आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाले. बॉयफ्रेंडला पाठवलेले सिक्रेट फोटो त्याने डिलीट करण्यास नकार दिला म्हणून एका तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या घाटकोपर भागात घडलीये. १७ वर्षांची ही तरुणी होती. 

Updated: Aug 5, 2016, 09:34 AM IST
सेल्फी डिलीट न केल्याने तरुणीची आत्महत्या title=

मुंबई : हल्ली कोणत्या ना कोणत्या कारणाने आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाले. बॉयफ्रेंडला पाठवलेले सिक्रेट फोटो त्याने डिलीट करण्यास नकार दिला म्हणून एका तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या घाटकोपर भागात घडलीये. १७ वर्षांची ही तरुणी होती. 

तिने आपल्या प्रियकराला तिचे खासगी फोटो पाठवले होते. मात्र या फोटोंचा गैरवापर होईल या भीतीने तिने त्याला ते फोटो डिलीट करण्यास सांगितले मात्र त्याने ते डिलीट करण्यास नकार दिला. 

वारंवार सांगूनही तिच्या बॉयफ्रेंडने ते फोटो डिलीट करण्यास नकार दिल्याने निराश झालेल्या तरुणीने जीवन संपवण्याचा मार्ग पत्करला. याप्रकरणी कम्प्युटर शिक्षक असलेल्या तरुणीच्या बॉयफ्रेंडला पोलिसांनी अटक केलीये.