यालाच म्हणतात `झी २४ तास`चा दणका...

`झी २४ तास`चा पुन्हा एकदा दणका काय असतो ते पहायला मिळालं आहे. मुंबईतल्या अंधेरीमध्ये राहणार्‍या स्वातंत्र्य सैनिकाच्या ८५ वर्षीय विधवा पत्नी मंगला दिघे यांना बाहेर कढण्याचा अमानुषपणा महापालिकेनं केला होता.

Updated: Apr 19, 2013, 09:50 PM IST

www.24taas.com, देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई
`झी २४ तास`चा पुन्हा एकदा दणका काय असतो ते पहायला मिळालं आहे. मुंबईतल्या अंधेरीमध्ये राहणार्‍या स्वातंत्र्य सैनिकाच्या ८५ वर्षीय विधवा पत्नी मंगला दिघे यांना बाहेर कढण्याचा अमानुषपणा महापालिकेनं केला होता. मात्र `झी २४ तास`नं दिघेंवरील अन्यायाला वाचा फोडल्यानंतर ६ दिवसांत सिटी सिव्हिल कोर्टानं दिघेंना घराचा ताबा देण्याचे महापालिकेला आदेश दिले आहेत.
स्वातंत्र्यसैनिकांच्या पत्नीला नुकसान भरपाई महणून १ लाख १० हजार रुपये देण्याचे आदेश ही कोर्टाने दिले आहेत. मंगला दिघे यांना ३ महिन्यांपूर्वी घराबाहेर काढले होते. `झी २४ तास`नं सातत्यानं या प्रकरणाचा पाठपूरवा करत स्वांतंत्र्य सैनिकाच्या पत्नीला न्याय मिळवून दिला.
भावूक झालेल्या मंगला दिघेंच्या कुटुंबीयांनी `झी २४ तास`चे आभार मानले आहेत. `झी २४ तास`मुळेच त्यांना न्याय मिळाला आहे. अशी त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली.