झी एक्सक्लुझिव्ह :...अशी आहे अंबानींची नवी कोरी बुलेटप्रूफ बीएमडब्ल्यू!

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्यात काय साम्य आहे? तर दोघांकडेही बुलेटप्रुफ आणि सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज अशी खास बीएमडब्ल्यू कार आहे. भारतात केवळ मोदी आणि अंबानी यांच्याच ताफ्यात असलेली ही आलिशान महागडी कार आहे तरी कशी... पाहुयात... 

Updated: May 20, 2015, 12:01 PM IST
झी एक्सक्लुझिव्ह :...अशी आहे अंबानींची नवी कोरी बुलेटप्रूफ बीएमडब्ल्यू! title=
एक्सक्लुझिव्ह : हीच ती कार

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्यात काय साम्य आहे? तर दोघांकडेही बुलेटप्रुफ आणि सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज अशी खास बीएमडब्ल्यू कार आहे. भारतात केवळ मोदी आणि अंबानी यांच्याच ताफ्यात असलेली ही आलिशान महागडी कार आहे तरी कशी... पाहुयात... 

खास जर्मनीहून आणलेली बीएमडब्ल्यू कार... किंमत केवळ ८ कोटी ४१ लाख रुपये... बीएमडब्ल्यू ७६०-एलआय प्रकाराची ही कार विकत घेतलीय ख्यातनाम उद्योगपती मुकेश अंबानी यांनी... अंबानी हे देशातील पहिलेच उद्योगपती आहेत, ज्यांच्याकडे अशी बुलेटप्रुफ बीएमडब्ल्यू आहे. याआधी पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात अशाच प्रकारच्या कारचा समावेश करण्यात आला होता.

या गाडीची खासियत म्हणजे ही गाडी पूर्णपणे बॉम्ब, बुलेट आणि गॅस प्रुफ आहे. संपूर्ण गाडीत सेन्सर लावण्यात आलेत. कंपनी फिटींग व्यतिरिक्त एकही वस्तू बाहेरची लावली गेल्यास गाडी तात्काळ डॅशबोर्डवर तशी सूचना देते आणि ती वस्तू गाडीपासून दूर केली जाते. उदाहरणार्थ, गाडीत टाईम बॉम्ब फिट केल्यास गाडी स्वत:हून बॉम्ब सोडून देईल आणि तशी माहिती चालकाला देईल. 

सुरक्षेसाठी गाडीत काही विशिष्ट ठिकाणी शस्त्रेही लावण्यात आलीत. गुदमरण्याची वेळ आली तर गाडीतच ऑक्सिजनची सोयही आहे. वातावरण कितीही धुरकट असलं तरी किमान 100 मीटरपर्यंत स्पष्ट दिसेल असे कॅमेरे त्यात लावण्यात आलेत. शिवाय इंटरनेट आणि सॅटेलाइट फोन आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गाडीत असं एक बटण आहे जे दाबल्यास गाडीच्या सर्व काचा फुटतात आणि इमरजन्सीच्यावेळी दरवाजे ब्लॉक झाले तरी तुम्ही गाडीतून सुखरूप बाहेर पडू शकता. 

मुकेश अंबानी यांची बुलेटप्रुफ कार जितकी अत्याधुनिक आणि सुरक्षित आहे याबाबत जेवढी गुप्तता पाळली गेली तेवढीच गुप्तता या बुलेटप्रुफ गाडीच्या आरटीओ पासिंग दरम्यान पाळली गेली. काही निवड वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मुकेश अंबानीच्या या महागड्या गाडीचे ताडदेव आरटीओ येथे पासिंग करण्यात आले.

मुकेश अंबानी यांच्या या नव्या कारची नोंदणी मुंबईतील ताडदेव आरटीओत करण्यात आलीय. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नावानं या कारची नोंदणी ७ मे रोजी करण्यात आली. त्यासाठी तब्बल २० टक्के टॅक्स कंपनीकडून वन टाइम भरण्यात आला. ही टॅक्सची रक्कम होती १ कोटी ६८ लाख २६ हजार ३५६ रुपये. मुकेश अंबानी यांच्या या बुलेटप्रुफ कारसाठी एमएच ०१ बीएस ११११ हा व्हीव्हीआयपी नंबर देण्यात आलाय. त्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजनं २ लाख १० हजार रुपये भरलेत. त्याशिवाय
- कस्टम ड्युटी
- इम्पोर्ट ड्युटी
- होमोग्लोशन सर्टिफेकेट
- सेल सर्टिफेकेट
- रोड व्हर्जिनेस सर्टिफिकेट
- बिल ऑफ लोडींग 
अशी सर्व कागदपत्रे ताडदेव आरटीओमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीने दिलेत.

मध्यंतरी मुकेश अंबानी यांना इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेनं धमकीचं पत्र पाठवलं होतं. त्यानंतर मुकेश अंबानी आणि कुटुंबियांना झेड प्लस सुरक्षा तसंच  सीआयएसएफ जवानांची सुरक्षा देण्यात आली होती. आता मुकेश अंबानी यांच्या ताफ्यात फुल्ली बुलेटप्रुफ कार आल्यानं अंबानींची सुरक्षा किती महत्त्वाची आहे स्पष्ट होते.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.