आधारकार्डावर आता जन्मतारखेची नोंद!

आधार कार्डाचा ओळखपत्र म्हणून वापर अनेक ठिकाणी सुरू झालाय. या कार्डावर जन्मतारीखेचा उल्लेख असायलाच हवा, ही सरकारी अट आहे. परंतू, आत्तापर्यंत कित्येकांच्या हातात जन्मतारेखेविनाच आधारकार्ड पडलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 9, 2013, 04:29 PM IST

www.24taas.com, नागपूर ?
आधार कार्डाचा ओळखपत्र म्हणून वापर अनेक ठिकाणी सुरू झालाय. या कार्डावर जन्मतारीखेचा उल्लेख असायला हवा. परंतू, आत्तापर्यंत नागरिकांच्या हातात जन्मतारेखेविनाच आधारकार्ड पडलंय.
आधारकार्डावर जन्मतारखेचा उल्लेख नसल्यामुळे, रेल्वे किंवा बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सवलत देण्यात अडचणी येत आहेत. तसंच गॅस सेवेसाठी केवायसीचे नियम पूर्ण करणं, बँक किंवा पोस्टात खातं उघडणं, आरटीओकडून ड्रायव्हिंग लायसन्स काढणं, मोबाईल फोन कनेक्शन घेणं, आयकराची कामं पार पाडणं अशा अनेक कामांसाठी अशा आधारकार्डांचा ओळखपत्र म्हणून उपयोग होणार नाही. त्यासाठी जन्मतारखेचा वेगळा पुरावा द्यावा लागेल.

परंतू, सरकारच्या निष्काळजीपणामुळे आत्तापर्यंत जवळजवळ २१ कोटी लोकांचा वेळ आणि त्यांच्या खिशातील दोन हजार कोटी वाय गेल्याचं चित्र दिसतंय. अनेकांना मिळालेल्या आधारकार्डावर जन्मतारिख आणि महिन्याचा उल्लेख नाही, केवळ जन्मवर्षाचा उल्लेख यावर आढळतोय.
याच प्रश्नावर आरटीआय कायद्याखाली अविनाश प्रभुणे यांनी एक तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सरकारी यंत्रणेच्या लक्षात आपली चूक आल्यानंतर यामध्ये सुधारणा करण्याचं आश्वासन दिलं गेलंय.