दिवाळीत विकला जातोय भेसळयुक्त खवा

दिवाळी म्हटली की खमंग फराळ आणि गोडधोड मिठाई आलीच. परंतु आपण जी मिठाई खातोय, ती किती शुद्ध आहे याचा कधी विचार केलाय... केला नसेल तर निदान आता तरी नक्कीच करा. कारण बाजारात विकल्या जाणा-या खव्याच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 31, 2013, 06:50 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
दिवाळी म्हटली की खमंग फराळ आणि गोडधोड मिठाई आलीच. परंतु आपण जी मिठाई खातोय, ती किती शुद्ध आहे याचा कधी विचार केलाय... केला नसेल तर निदान आता तरी नक्कीच करा. कारण बाजारात विकल्या जाणा-या खव्याच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. नागपूरमधील एका बसस्थानकाच्या स्वच्छतागृहात तब्बल 600 किलो खवा सापडल्याने खळबळ माजलीय.
घाणीत पडलेली आणि खव्याने भरलेली पोती पाहिलीत तर आयुष्यात परत मिठाई खाण्याची हिम्मत होणार नाही. नागपूरच्या टेकडी रोड परिसरातील मध्य प्रदेशच्या बस स्थानकावर यासंदर्भातील घटना समोर आली. शेजारच्या राज्यातून 600 किलो खवा 25 पोत्यांमध्ये भरून बसमधून नागपूरला आणण्यात आला. यापैकी 15 पोती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली असून तपासणीकरता प्रयोगशाळेत पाठवला आहे. अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत संबंधितांवर कारवाई होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान १० पोते खवा शहराच्या विविध बाजारात आधीच दाखल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बाजारात महागडा खवा विकत घेताना तो गुणवत्तेच्या चाचणीवर खरा उतरेल का आणि त्याचे सेवन केल्यानंतर आपल्या परिवाराच्या सदस्यांची प्रकृती तर बिघडणार नाही ना, हा प्रश्न सर्वसामान्य नागपूरकरांना पडलाय. सरकारने या महत्वाच्या प्रश्नावर बघ्याची भूमिका न घेत मध्यस्ती करत कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दिवाळीच्या तोंडावर आली असताना हा प्रकार उघडकीस झाल्याने सर्वसामान्य नागपूरकरांच्या तोंडची चव पळालीय. अशा घटना टाळण्यासाठी खवा विक्रेत्यांवर लगाम कसणे आवश्यक झालेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.