भोंदूबाबाने केली ८१ हजारांची फसवणूक

भोंदुबाबाच्या उपचारामुळे नागपुरात एक महिलेचा कॅन्सर बळावल्याचा प्रकार `झी मीडिया`नं नुकताच उघडकीस आणलाय. आता त्यापाठोपाठ नागपुरात आणखी एका भोंदूबाबानं एका युवतीला 81 हजार रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 4, 2013, 10:08 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
भोंदुबाबाच्या उपचारामुळे नागपुरात एक महिलेचा कॅन्सर बळावल्याचा प्रकार `झी मीडिया`नं नुकताच उघडकीस आणलाय. आता त्यापाठोपाठ नागपुरात आणखी एका भोंदूबाबानं एका युवतीला 81 हजार रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलंय. कोणत्याही समस्येवर उपचार करण्याचा दावा करणारा हा भोंदूबाबा सध्या वेगवेगळ्या नावानं समाजात वावरतोय.
नागपूरातल्या शितल नाईकचं लग्न जमत नव्हतं. लग्न जमवण्याच्या काळजीत अससलेल्या शीतलला बसमधून प्रवास करताना गुरुजी शनी भारती या भोंदूबाबाची जाहिरात दिसली. आपल्याला सतावत असलेल्या प्रश्नाचं उत्तर हा बाबा देईल या वेड्या आशेपायी जाहिरातीत दिलेल्या नंबरवर तिनं संपर्क केला बाबाच्या सांगण्यावरुन बॅँकेच्या खात्यात सुरुवातीला साडे तीन हजार रुपये जमा केले. पण तिचा हा निर्णय पूर्णपणे चुकला होता. घरात अपशकुन होईल असा धाक दाखवत या भोंदूबाबानं तिच्याकडं तब्बल 81 हजार रुपये उकळले.
आपल्याकडचं सारं दिलं तरीही फायदा काहीच झाला नाही. पैसे परत मागितले तर तेही मिळत नव्हते. आपण फसले गेलोय हे लक्षात येताच शितलनं नागपुरच्या अनिसच्या कार्यालायत धाव घेतली. अंनिसन या प्रकरणात तक्रार दाखल व्हावी म्हणून अंबाझरी आणि नंदनवर या दोन पोलीस स्टेशनचे उंबरठे झिजवले. पण अजूनही या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही.
पदवीधर असलेल्या शितल सारख्या तरुणीनं कोणताही विचार न करता 81 हजार रुपये त्याच्या खात्यात जमा केले. समाजात अंधश्रद्धा किती रुजली आहे याचं हे एक प्रातिनिधिक उदाहरण. पण आता या प्रकरणात भोंदूबाबावर कारवाई करण्याचं टाळत नागपूर पोलीस अशा अनेक शीतलच्या फसवणूकीला अप्रत्यक्षपणे मदतच करतायत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.