भाजप-संघातील मतभेद दूर!

ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यापाठोपाठ भाजपा अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी आज नागपुरातल्या संघ कार्यालयात जावून सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 6, 2013, 10:41 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यापाठोपाठ भाजपा अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी आज नागपुरातल्या संघ कार्यालयात जावून सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. लागोपाठ दोन दिवस झालेल्या भाजपा-संघ चिंतन बैठकीनंतर दोन्ही बाजूंमधील मतभेद दूर झाले आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिलीय.
शुक्रवारी लालकृष्ण अडवाणी आणि शनिवारी पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी रा.स्व. संघाच्या मुख्यालयात घेतलेली धाव मोठी सूचक आहे. लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत.युपीए सरकारची निर्णय घाई पाहता ह्या निवडणुका काही महिन्यांतच होतील असा अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर आपली मातृसंस्था असलेल्या संघाच्या मुख्यालयात भाजपा नेत्यांनी धाव घेतलीय. रेशीमबागेच्या बंद दरवाज्या आड झालेल्या चर्चेनंतर भाजपा आणि संघ एकत्र आल्याचं स्पष्ट झालंय. भाजपामधील अंतर्गत मतभेदांनाही यामुळे पूर्णविराम मिळालाय.
राजनाथ सिंह प्रमाणेच लालकृष्ण अडवाणींनीही सरसंघचालकांची घेतलीली भेट महत्तवाची मानली जातेय. या भेटीनंतर अडवाणी आणि भागवत यांच्यात दिलजमाई झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. नवे मित्रपक्ष जोडण्याची जबाबदारी अडवाणींवर सोपवण्यात आली असून काँग्रेस हटाओवर हेच आता भाजपा आणि संघ परिवाराचे एकत्रित लक्ष्य असणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.