लग्न जुळवून देण्याचे आमिष, भोंदू बाबाला अटक

मंत्र-तंत्राच्या माध्यमाने लग्न जुळवून देण्याचे आमिष दाखवत एका युवतीला ८१ हजार रुपयांना लुबाडणा-या भोंदू बाबाला नागपूर पोलिसांनी अटक केलीय. उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यातून त्याला अटक करण्यात आलीय. `झी मीडिया` या प्रकरणाला सर्वप्रथम वाचा फोडत सातत्यानं पाठपुरावा केला होता.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 8, 2013, 10:52 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
मंत्र-तंत्राच्या माध्यमाने लग्न जुळवून देण्याचे आमिष दाखवत एका युवतीला ८१ हजार रुपयांना लुबाडणा-या भोंदू बाबाला नागपूर पोलिसांनी अटक केलीय. उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यातून त्याला अटक करण्यात आलीय. `झी मीडिया` या प्रकरणाला सर्वप्रथम वाचा फोडत सातत्यानं पाठपुरावा केला होता.
नागपुर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मुस्तकीम या भोंदूबाबाने लग्न जमवण्याचं आमिष दाखवत युवतीची 81 हजारांची फसवणूक केली. नागपूर शहरातल्या दिघोरी भागात राहणा-या शीतल नाईक या युवतीचं लग्न जमत नव्हत. लग्न जमवण्याच्या काळजीत अससलेल्या शीतलला बसमधून प्रवास जाहिरात दिसली. आपल्याला सतावत असलेल्या प्रश्नाचं उत्तर हा बाबा देईल या वेड्या आशेपायी जाहिरातीत दिलेल्या नंबरवर तिनं संपर्क केला बाबाच्या सांगण्यावरुन बॅँकेच्या खात्यात सुरुवातीला साडे तीन हजार रुपये जमा केले. पण तिचा हा निर्णय पूर्णपणे चुकला होता. या भोंदूबाबानं तिच्याकडं तब्बल 81 हजार रुपये उकळले.
आपण फसल्याचे लक्षात आल्यावर शीतलने नागपूरच्या नंदनवन पोलिस ठाण्यात तक्रार केली. राज्य सरकारने नव्याने पारित केलेल्या जादूटोणा विधेयकाच्या तरतुदी अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि संबंधित बँकेच्या मदतीने बाबाचा शोध सुरु केला. मोबाइल फोनच्या माध्यमाने पोलिसांनी त्याला हुडकून काढले.
राज्य सरकारच्या अध्यादेशा नंतर आता सर्वत्र पसरलेल्या भोंदू बाबांवर कारवाईला सुरवात झालीय़. अशा प्रकराचे भोंदू बाबांचा खेळ खलास होणं हीच अंधश्रद्धा निर्मुलनासाठी प्राणांची आहुती देणा-या नरेंद्र दाभोलकरांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

व्हिडिओ पाहा