एका अपघातानं केला देशी कट्ट्यांच्या तस्करीचा भांडाफोड

एका अपघातानं देशी तस्करींचा भांडाफोड केलाय. अमरावतीजवळ ही घटना घडलीय. मुख्य म्हणजे, देशी कट्ट्यांच्या या तस्करीत एका जोडप्याला अटक करण्यात आलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 24, 2013, 07:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, अमरावती
एका अपघातानं देशी तस्करींचा भांडाफोड केलाय. अमरावतीजवळ ही घटना घडलीय. मुख्य म्हणजे, देशी कट्ट्यांच्या या तस्करीत एका जोडप्याला अटक करण्यात आलीय.
अमरावतीजवळ एका दुचाकीवरून जात असलेल्या एका दाम्पत्याच्या वाहनाला अपघात झाला. त्यावेळी, अधिक चौकशी करताना पोलिसांनी या अपघातग्रस्त दुचाकी वाहनाच्या डिक्कीतून चार देशी कट्ट्यांसह आठ जिवंत काडतुसं सापडली. बडनेरा पोलीस ठाण्याअंतर्गत निंभा गावाजवळ रात्री साडेसात वाजता हा अपघात झाला होता. त्यात हा प्रकार उघडकीस आलाय. शहरातून देशी कट्ट्यांची तस्करी होत असल्याचं या घटनेतून उघड झालंय.
अमरसिंग किसनसिंग बावरी व त्याची पत्नी कीर्तिकौर अमरसिंग बावरी हे दाम्पत्य तळेगाव येथील राहणार असून या दाम्पत्याजवळून हे देशी कट्टे व काडतूस मिळाले आहे. प्रत्येक देशी कट्टय़ाची किंमत २५ हजार रूपयांच्या घरात असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.