राज्यात पावसाचं धुमशान, पुराचा तडाखा

राज्यात पावसाचं धुमशान सुरू आहे. कोकणातील महाडमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. नाशिकमधील गोदावरी नदीला पूर आला असून चंद्रपूर जलमय झाले आहे. तर जळगावात पुरामुळं शेतीचं नुकसान झाले आहे. ८ दिवसांनंतर सुरू झालेला माळशेज घाट पुन्हा बंद झालाय.

www.24taas.com, झी मीडिया, चंद्रपूर
राज्यात पावसाचं धुमशान सुरू आहे. कोकणातील महाडमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. नाशिकमधील गोदावरी नदीला पूर आला असून चंद्रपूर जलमय झाले आहे. तर जळगावात पुरामुळं शेतीचं नुकसान झाले आहे. ८ दिवसांनंतर सुरू झालेला माळशेज घाट पुन्हा बंद झालाय.
चंद्रपूरवर निसर्ग कोपलाय. पावसाळ्याच्या दोन महिन्यांतच वार्षिक सरासरीच्या १२० टक्के पाऊस पडलाय. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं जिल्ह्यातल्या २ लाख १६ हजार ४५० हेक्टरवरील शेत पिकांचं नुकसान झालंय. तर अतिवृष्टीमुळे २०जणांचा मृत्यू झालाय.
शेतीचं सर्वाधिक नुकसान वरोरा तालुक्यात झालय. अतिवृष्टीमुळे ८६३ गावातील ७९५१ कुटुंब बांधित झाले असुन ८ हजार घरांना पावसाचा फटका बसलाय.जिल्ह्यातील सर्व तालुक्यांनी पावसाची सरासरी ओलांडलीय.सतत बरसणारा पाऊस आणि इरई धरणाच्या विसर्गामुळे चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यातील बहुंताश भाग जलमय झालाय.प्रशासनाने सतर्कतेचा उपाय म्हणून शहरातील अनेक परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी हवविण्यास सुरुवात केलीय.

नाशिकला सतर्कतेचा इशारा
नाशिकमधल्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. गंगापूर धरणातून आणखी दोन हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. एकूण सहा हजाय क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे.
नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच आहे. गेल्या २४ तासात ४६४ मिमि.पाऊस झाल्यानं गोदावरीसह दारणा,वालदेवी,नासरडी नद्यांच्या पाण्याच्या पातळीत सातत्यानं वाढ होतेय.गंगापूर धरणातून ४ हजार क्युसेस पाणी सोडल्यानंतर सायंकाळी ६ हजार क्युसेस पाणी सोडण्यात येत असल्यानं गोदाकाठच्या १६५० नागरिकांना सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्यात.धरणलाभ क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्यानं पाण्याचा विसर्ग सलग तिस-या दिवशी सुरु असून गोदावरीच्या पुरामुळे रामकुंड परिसरातील सगळे मंदिर पाण्याखाली गेल्यात.प्रशासनातर्फे सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्यात.
गोदावरीला पूर
नेहमी प्रदूषणासाठी चर्चेत असणारी गोदावरी आता दुथडी भरून वाहू लागलीय. यंदाच्या मोसमातला गोदावरीचा पहिलाच पूर असल्यानं गोदेचं हे लोभसवाणं रूप बघण्यासाठी नाशिककर गर्दी करतायत. तर पट्टीचे पोहणारे पुराच्या पाण्यात पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटताना दिसतायत. गुरुवारी दुपारी ४ हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आल्यानं गोदावरीची पातळी दहा ते बारा फुटांनी वाढलीय. त्र्यंबकेश्वर आणि गंगापूर धरण समूह क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यानं गोदावरीला पूर आलाय आणि गोदाकाठची सगळी मंदिरं पाण्याखाली गेलीयत. तर दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलंय.
सांगली पूरस्थिती
सांगली जिल्हातल्या पश्चिमेला पूरस्थिती असली तरी, पूर्व भागातल्या पाच तालुक्यात अजूनही दुष्काळी परिस्थिती कायम आहे. पाण्याअभावी दुष्काळग्रस्तांची आणि चा-याअभावी जनावरांची तडफड सुरुय. अजूनही अनेक ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू आहेत. मात्र दुष्काळी तालुक्यात समाधानकारक पाऊस पडला नसतानादेखील प्रशासन चारा छावण्या बंद करतंय. आधी अस्मानी आणि आता सुलतानी संकट आल्यानं दुष्काळग्रस्त आक्रमक झालेत. चारा छावण्या बंद केल्या, तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा दुष्काळग्रस्तांनी दिलाय.
जळगावला पुराचा फटका
तापी तसेच पूर्णा नदीच्या उगम क्षेत्रात झालेल्या जोरदार पाऊसामुळे या दोन्ही नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्याचा फटका जळगाव जिल्ह्यातील आनेक गावांना बसलाय.. रावेर तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील ८ ते १० गावांना या पुराच्या पाण्याचा फाटका बसलाय.
हतनूर धरणात पुराचे पाणी अडविले जात आसल्याने बॅकवॉटर साचून धरणाच्या फुगवट्यात येणा-या गावांना नेहमीच पुराचा धोका निर्माण होतो.या पुराचे पाणी वाढल्यामुळं खिरवड गावातील जितेंद्र दामोदर हा २५वर्षीय युवक पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं बेपत्ता आहे.
या भागातील रस्ते वाहतुकही पुरामुळे विस्कळीत झालीय.पुराच्या पाण्यामुळे सुमारे १ हजार हेक्टर क्षेत्रावरील बागायती केळीच पिक पाण्याखाली गेल्यानं शेतक-यांच कोट्यावधी रुपयांच नुकसान झालय.तसचं खरीप हंगामातील कापूस ,सोयाबीन ही पीक पाण्याखाली गेलीयं.
रावेर तालुक्यातील एनपुर,विटावा,निंबोल तसचं खिरवड या गावांना पुराच्या पाण्याचा सर्वाधिक जास्ता फटका बसलाय.या गावांना शासनाकडून कुठलीही मदत मिळत नसल्याची खंत निंबोलमधल्या शेतक-यांनी व्यक्त