दुसऱ्या लग्नाला केला म्हणून पत्नीची हत्या!

पुरोगामी महाराष्ट्रात आजही वंशाच्या दिव्यासाठी आणि हुंड्यासाठी विवाहितांच्या हत्या होत आहेत. बुलडाण्यातदेखील याच कारणावरून एका विवाहितेची हत्या करण्यात आली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 3, 2013, 07:27 AM IST

www.24taas.com, बुलडाणा
पुरोगामी महाराष्ट्रात आजही वंशाच्या दिव्यासाठी आणि हुंड्यासाठी विवाहितांच्या हत्या होत आहेत. बुलडाण्यातदेखील याच कारणावरून एका विवाहितेची हत्या करण्यात आली.
बुल़डाण्यातल्या आमखेड इथं वंशाला दिवा पाहिजे म्हणून दुसरे लग्न करण्यासाठी पत्नीनं परवानगी नाकारल्याच्या कारणावरून रागाच्या भरात पतीनं पत्नीची हत्या केली. पतीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून तो फरार आहे.

दुसरी घटना बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव गड इथं घडली आहे. संगीता तायडेला मुलबाळ होत नसल्यामुळे तिला नवरा शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. 1 एप्रिलला याच कारणावरून लाठीनं मारहाण करत असताना संगीताचा जागीच मृत्यू झाला. मृत संगीताच्या आईनं अर्जुन तायडेंविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आलीय.