विदर्भात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

आज विदर्भात लोकसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. विदर्भातील प्रमुख उमेदवारा आज अर्ज भरतील.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 22, 2014, 11:33 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
आज विदर्भात लोकसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. विदर्भातील प्रमुख उमेदवारा आज अर्ज भरतील. लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाप्रमाणे महाराष्ट्रातील पहिल्या टप्यातील या जागा आहेत. या टप्प्यात १० विदर्भातील १० मतदार संघांचा समावेश आहे.
नागपूरातून भाजचे नितीन गडकरी अर्ज भरणार आहेत. तर भंडारा-गोंदियातून राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल अर्ज भरतील. यवतमाळमधून काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव मोघे उमेदवारी अर्ज आज भरतील.

पहिला टप्पा : १० मतदार संघ
मतदारसंघ - बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ-वाशिम, वर्धा, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली-चिमूर
- अधिसूचना जारी करण्याची तारीख : १५ मार्च
- उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस : २२ मार्च
- अर्जांची छाननी - २४ मार्च
- अर्ज मागे घेण्याची तारीख - २६ मार्च
- मतदान : १० एप्रिल

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.