प्रेमप्रकरण प्राध्यापक वडिलांची गोळ्या घालून हत्या

नागपूरमध्ये प्राध्यापकाची राहत्या घरात हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. योगेश डाखोळे असं या प्राध्यापकाचं नाव असून, ते केडीके कॉलेजमध्ये प्राध्यापक होते.

Updated: Apr 3, 2013, 05:04 PM IST

www.24taas.com, नागपूर
नागपूरमध्ये प्राध्यापकाची राहत्या घरात हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. योगेश डाखोळे असं या प्राध्यापकाचं नाव असून, ते केडीके कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. देशी कट्ट्याने गोळी झाडून राहत्या घरात त्यांची हत्या करण्यात आली आहे.
हल्लेखोराने प्राध्यापकांच्या पत्नीवरही हल्ला केला. कुसुम डाखोळे यांच्यावर चाकू आणि रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी अन्वर खान याला पोलिसांनी अटक केली आहे. अन्वर खान आणि प्राध्यापक डाखोळे यांच्यात मुलीमध्ये प्रेमसंबंध होते.
प्रेमसंबंधात मात्र काही दिवसांपूर्वी या बेबनाव झाला होता. त्यानंतर अन्वर खान मुलीला त्रास देत असल्याची तक्रार डाखोळे यांनी पोलिसांत केली होती. त्या वादातूनच हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येत आहे.