समुद्रातील स्मारकाचं काय, काँग्रेस आमदारांचा सवाल

By Surendra Gangan | Last Updated: Tuesday, December 18, 2012 - 19:42

www.24taas.com,नागपूर
अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रस्तावित स्मारकाला विलंब का होतोय असा सवाल काँग्रेस आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उपस्थित केलाय.
चार वर्षांपूर्वी सरकारनं अरबी समुद्रात स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. मात्र या स्मारकाची पुढील कार्यवाही अद्यापही झाली नाही. आंदोलन केल्याशिवाय सरकार या स्मारकाच्या उभारणीकडे लक्ष देणार नाही का असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केलाय.

First Published: Tuesday, December 18, 2012 - 19:42
comments powered by Disqus