पत्नी गेली माहेरी, पतीची ‘शोले’तील ‘वीरू`गिरी

कूद जाऊंगा फांद जाऊंगा... सुसाइड.... सुसाइड असं म्हणणारा ‘शोले’ वीरू म्हणजे धर्मेंद्र आपल्या आठवत असेल. एका पतीराजाने आपली पत्नी माहेरून परत यावी यासाठी शोले चित्रपटातील ‘वीरू’गिरी केल्याची घटना अमरावती जिल्ह्यात वऱ्हा या गावी घडली आहे. यासाठी तो चक्क दीडशे फूट उंच मोबाईल टॉवरवर चढला.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 28, 2014, 04:34 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, अमरावती
कूद जाऊंगा फांद जाऊंगा... सुसाइड.... सुसाइड असं म्हणणारा ‘शोले’ वीरू म्हणजे धर्मेंद्र आपल्या आठवत असेल. एका पतीराजाने आपली पत्नी माहेरून परत यावी यासाठी शोले चित्रपटातील ‘वीरू’गिरी केल्याची घटना अमरावती जिल्ह्यात वऱ्हा या गावी घडली आहे. यासाठी तो चक्क दीडशे फूट उंच मोबाईल टॉवरवर चढला.
सुभाष देवीदास इंगळे असे या कथित ‘वीरू’चे नाव असून त्याचे कौटुंबिक वादावरून पत्नीशी भांडण झाले. त्यामुळे एक वर्षापासून त्याची पत्नी माहेरी निघून गेली. पत्नीला आणण्यासाठी स्वत: आणि नातेवाइकांकडून करण्यात आलेले सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. त्यामुळे सुभाषने पत्नी पुन्हा घरी यावी, यासाठी प्रयत्न सुरू केले. तो वऱ्हा येथून मार्डी गावात राहणाऱ्या नातेवाइकांकडे आला. परंतु, पत्नीसंदर्भात तोडगा निघत नसल्याचे बघून, त्याने मार्डी येथील उंच मोबाईल टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला.
पोलिसांनी सुभाषला टॉवरवरून खाली उतरण्यास सांगितले. मात्र, तो काही केल्या खाली उतरेना. अखेर सुभाषच्या नातेवाइकांनी ध्वनिक्षेपकावरून पत्नीला घेऊन येण्याचे आश्वाॉसन दिल्यानंतर तो खाली उतरला. पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुभाषविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.