अरविंद केजरीवाल वेडा मुख्यमंत्री – सुशीलकुमार

दिल्लीतले आंदोलन संपले असले तरी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यातला संघर्ष अजूनही संपलेला नाही.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 22, 2014, 07:35 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, हिंगोली
दिल्लीतले आंदोलन संपले असले तरी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यातला संघर्ष अजूनही संपलेला नाही. अरविंद केजरीवाल हा वेडा मुख्यमंत्री आहे अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केजरीवाल यांची खिल्ली उडवली आहे.
आता केजरीवाल यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिल्ली पोलिसांवर कारवाई करण्यासाठी केजरीवाल यांनी दोन दिवस केंद्रीय गृहमंत्रालयाविरोधात आंदोलन छेडले होते. त्यानंतर दोषी असलेल्या पोलिसांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं.
“मी पीएसआय होतो, तेव्हा कामाच्या व्यस्तपणामुळे सुट्टी मिळत नव्हती. त्यामुळे मी हनीमूनलाही जाऊ शकलो नाही. त्यावेळी मुंबईत दंगल सुरू होती. दिल्लीत वेड्या मुख्यमंत्र्याच्या आंदोलनामुळे दिल्लीतील बहुतेक पोलिसांच्या सुट्ट्या मला रद्द कराव्या लागल्या”, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
वेड्या मुख्यमंत्र्याच्या आंदोलनामुळे दिल्ली सोडता येत नाही, असंही शिंदेंनी नमूद केलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.