शरद पवारांचा `यू टर्न`!

By Jaywant Patil | Last Updated: Sunday, September 15, 2013 - 20:38

www.24taas.com, झी मीडिया, यवतमाळ
मुख्यमंत्र्यांना काही दिवसांपूर्वीच टीकेचं लक्ष करणा-या केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आता नरमले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास व्यक्त करण्याची भाषा करत त्यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे.
अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले पॅकेज अद्याप मिळालेलं नाही या प्रश्नाच्या उत्तरात पवारांनी मुख्यमंत्र्यांवर पूर्ण विश्वास व्यक्त केलाय.. शिवाय मुख्यमंत्री जे वक्तव्य करतात त्यावर ते विलंब झाला तरी अंमलबजावणी करतात असं पवारांनी म्हटलंय. ते यवतमाळमध्ये बोलत होते.
‘अलिकडच्या काळात प्रशासनातील लोकांचा हात सही करताना थरथरतो. त्यांना लकवा धरला की काय..? दोन-दोन महिने फायलींवर सह्या होत नाहीत, अशा शब्दांत पवारांनी मुख्यमंत्र्यांचा नामोल्लेख टाळून घरचा आहेर दिला होता. यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कालच्या शरद पवारांच्या वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. नियमबाह्य कामं असल्यानं विचार करावा लागतो असं सांगत त्यांनी पवारांना टोला हाणलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, September 15, 2013 - 19:59
comments powered by Disqus