गर्दी बघून माझ्या डोक्यात हवा जात नाही - उद्धव

मी देखील लहानपणापासून गर्दी पाहत आलोय, त्यामुळे अशी गर्दी बघून माझ्या डोक्यात हवा जात नाही.. गर्दी होते पण त्याचं मतामध्ये कुठं रुपांतर होतयं?

Updated: Mar 9, 2013, 07:31 PM IST

www.24taas.com, अमरावती
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमरावतीमधील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना चांगलाच टोला हाणाला आहे. ही जी गर्दी आहे, ती उद्धव ठाकरे यांची नाहीये, ही गर्दी आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे. मी देखील लहानपणापासून गर्दी पाहत आलोय, त्यामुळे अशी गर्दी बघून माझ्या डोक्यात हवा जात नाही.. गर्दी होते पण त्याचं मतामध्ये कुठं रुपांतर होतयं?असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंना टोला लगवाला.
अमरावती, वाशिम, रामटेक, बुलडाणा हे मतदार शिवसेनेचे आहेत आणि ते आमचेच राहणार. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही टीकास्त्र सोडलं आहे. राज्यात दुष्काळ पडलेला असताना... अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न बघत आहे.
अजित पवारांनी त्याआधी ७० हजार कोटीच्या जलसिंचन घोटाळ्याबाबत बोलवं. काका- पुतणे निधी पळवणारे दरोडेखोर आहेत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पवार काका-पुतण्यांवरही निशाणा साधला.