मंगला एक्सप्रेस अपघात : जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल

By Surendra Gangan | Last Updated: Friday, November 15, 2013 - 15:10

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
इगतपुरीजवळ घोटी इथं आज सकाळी साडेसहाच्या सुमारास रेल्वे अपघात झाला. या अपघातात ३ जण ठार झालेत २९ प्रवासी जखमी आहे. जखमींना घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर गंभीर जखमींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पहाटे इगतपुरी घोटी इथं दिल्ली-एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेसचे १० डबे रुळावरून घसरलेत. रेल्वे रूळ तुटल्यामुळे गाडी घसरल्याचं सागंण्यात येतंय. या अपघातत एस ८, एस ९, एस १० या क्रमांकाचे डबे एकमेकांवर चढले. काही डबे रहिवासी भागात उडाल्याचं सांगण्यात येतंय. या अपघातामुळे मुंबईहून नाशिककडे आणि दिल्लीहून मुंबईकडे होणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. वाहतूक सुरळीत करण्यास किमान १२ तास लागतील, असं सांगण्यात येतंय.
डबे हटवण्यासाठी भुसावळवरून क्रेन येणार आहे. त्यामुळे क्रेनला उशीर झाल्यानं वाहतूक जास्त वेळ खोळंबणार असं सांगण्यात येतंय. यामुळे मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस रद्द, मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस निफाडला थांबवली. नागपूर सेवाग्राम राज्यराणी एक्स्प्रेसही खोळंबली. दोन्ही बाजूंची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी नाशिक-कसारा दरम्यान एसटी महामंडळाने विशेष बसेस सुरू केल्या आहेत.

 
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, November 15, 2013 - 15:10
comments powered by Disqus