अजितदादांची राज ठाकरेंवर तोफ

नाशिकमधील खड्ड्यांवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सणसणीत टोला लगावलेला.

प्रशांत जाधव | Updated: Aug 16, 2013, 11:22 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिकमधील खड्ड्यांवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सणसणीत टोला लगावलेला. नाशिकमध्ये खड्डे करणाऱ्यांना नाशिककर मत देतात हे आमचे दुर्दैव आहे, अशी अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत तोफ डागली.
नाशिकमध्ये रस्ताच नाही. अहो नाशिकमधील रस्त्याला काही कोटी रुपये दिले. नाशिकचे तेच हाल ओझरचे तेच हाल. इथं खड्डे करणाऱ्या लोकांना बाजुला करून आम्ही पैसे देतो. पण नाशिककर खड्डे करणाऱ्यांनाच मतं देतात. शहरातही तसंच आणि ग्रामीणमध्येही तसंच.... हे काय आपल्याला पटलेलं नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.