वादग्रस्त विकास आराखडा महासभेत खुला!

नाशिक शहराचा वादग्रस्त विकास आराखडा अखेर आज विशेष महासभेत खुला करण्यात आला. यावर आठ दिवसात अभ्यास करून हरकती मांडण्यासाठी वेळ देण्यात आलीय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 16, 2013, 09:13 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिक शहराचा वादग्रस्त विकास आराखडा अखेर आज विशेष महासभेत खुला करण्यात आला. यावर आठ दिवसात अभ्यास करून हरकती मांडण्यासाठी वेळ देण्यात आलीय.
मात्र हा विकास आराखडा बांधकाम व्यावसायिकांनी अधिका-यांना हाताशी धरून ग्रीनचे यलो झोन केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. तसंच यात शेतक-यांचं नुकसान होत असल्याचा दावा करण्यात आला असून यावर लेखी मतदान करण्याची मागणी विरोधकांनी केलीय.
दरम्यान, आराखडा फुटीची चौकशी करण्यासाठी गटनेत्यांच्या समितीची घोषणा करण्यात आलीय. मात्र आराखड्याच्या प्रतीच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाल्यानं या गोंधळातच सत्ताधा-यांनी सभा गुंडाळली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.