नाशिकमध्ये भरदिवसा गोळीबार, तरूण ठार

Last Updated: Monday, March 10, 2014 - 11:28

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
नाशिकच्या पंचवटी भागात झालेल्या गोळीबारात एका तरूणाचा मृत्यू झाला आहे.
गोळीबारात ठार झालेल्या युवकाचं नाव प्रवीण हांडे असं आहे.
प्रवीण हांडे यांच्यावर कोणत्या कारणावरून गोळीबार झाला याचा शोध पोलिस घेत आहेत.
प्रवीणच्या डोक्याला गोळी लागल्याचं सांगण्यात येत आहे.
जखमी अवस्थेत प्रवीणला उपचारासाठी नेण्यात आलं, पण त्याचा मृत्यू झाला आहे.
प्रवीण हांडे यांने आयटीआयचं शिक्षण पूर्ण केलं होतं. पंचवटी परिसरातील उदय कॉलनीत ही घटना घडली.
नाशिक शहर आणि जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होतांना दिसतेय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, March 10, 2014 - 11:27
comments powered by Disqus