नाशिकच्या ४ युवकांचा बुडून मृत्यू

Last Updated: Sunday, January 19, 2014 - 21:44

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिक शहराजवळ असलेल्या कश्यपी धरणात ४ तरूणांचा बुडून मृत्यू झाला आहे. या तरूणांच्या मृत देहांचा शोध अजुनही लागलेला नाही.
हे तरूण नाशिक शहरातील मेरी म्हसरूळ भागातील होते. या चारही तरूणांचं वय १८ ते २० दरम्यान असल्याचं सांगण्यात येत आहे.
वाढदिवस साजरा करण्यासाठी हे चारही तरूण कश्यपी धरणावर आले होते. या घटनेत महेश पवळे , पंकज भगरे , नितेश भगरे आणि अतुल चव्हाण यांचा दुर्देवी अंत झाला आहे.
वाढदिवसाचं सेलिब्रेशनसाठी आलेले हे कॉलेज युवक धरणात पोहायला उतरले आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतदेह शोधण्याचं काम अजूनही सुरू आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, January 19, 2014 - 20:26
comments powered by Disqus