पुणे, नाशिककरांसाठी आनंदाची बातमी!

पुणे आणि नाशिकमध्ये उद्यापासून दिवसांतून दोन वेळा पाणीपुरवठा होणार आहे. अजित पवार, पुणे महापालिका आयुक्त यांच्या बैठकीत पुण्या्च्या पाणीपुरवठ्याबद्दल निर्णय घेण्यात आलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 1, 2013, 08:41 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे, नाशिक
पुणे आणि नाशिकमध्ये उद्यापासून दिवसांतून दोन वेळा पाणीपुरवठा होणार आहे. अजित पवार, पुणे महापालिका आयुक्त यांच्या बैठकीत पुण्या्च्या पाणीपुरवठ्याबद्दल निर्णय घेण्यात आलाय.
पुण्याला पाणीपुरवठा करणा-या धरणांमध्ये पुरेसं पाणी आहे. गेल्या वर्षभरापासून पुणेकर पाणीकपातीचा सामना करत होते. आता पुणेकरांच्या घरी दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा होणार आहे.
तर नाशिकवरही वरुणराजानं कृपा केलीय. महापालिकेनं शहरातली पाणीकपात रद्द केलीय. नाशिकला पाणीपुरवठा करणारी धऱणं भरलीयत. त्यामुळे ही पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. नाशिकमध्ये सध्या ३० टक्के पाणीकपात सुरू होती. पण आता उद्यापासून नाशिककरांना भरपूर पाणी मिळणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.