भुजबळांच्या उमेदवारीला विरोध, मनमाडमध्ये रास्तारोको

By Surendra Gangan | Last Updated: Saturday, March 1, 2014 - 17:51

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेसाठी छगन भुजबळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. आज येवला बंदची हाक देण्यात आलीये. मनमाड-अहमदनगर रस्त्यावर रास्तारोको करण्यात आलाय. भुजबळांच्या उमेदवारीला विरोध होतोय.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळांची उमेदवारी जाहीर करून शरद पवारांनी त्यांचा गेम केल्याची खमंग चर्चा रंगलीय. अनेक दिग्गज मंत्र्यांना लोकसभेची उमेदवारी देणार, असं आधी पवारांनी सांगितलं होतं. मात्र प्रत्यक्षात एकट्या भुजबळांनाच लोकसभेवर पाठवून पुतणे अजित पवारांचं वर्चस्व वाढवण्याचा पवारांचा प्रयत्न आहे की काय, असं बोललं जातंय. त्यामुळं भुजबळ समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदतोय.
हा असंतोष मनमाड-अहमदनगर रस्त्यावर दिसून आला. लोकसभेसाठी छगन भुजबळांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानं भुजबळ समर्थकांनी आता पक्ष नेतृत्वावर दबाव टाकण्याची रणनिती आखलीय.
त्याचसाठी शनिवारी येवला बंदची हाकही देण्यात आलीय. इतकंच नाही तर राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आपल्या पदांचे राजीनामे तयारी केली आहे. दरम्यान, रास्ता रोको करत पवारांचा निषेध केला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, March 1, 2014 - 15:49
comments powered by Disqus