मनसे प्रदेश सरचिटणीस यांना अटक

By Surendra Gangan | Last Updated: Thursday, January 16, 2014 - 12:52

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
महाराष्ट्र नव निर्माण सेना प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक यांना नाशिकमध्ये सातपूर पोलिसांनी अटक केली. २००९ च्या विधानसभा निवडणुकांवेळी झालेल्या पोस्टरबाजी प्रकरणी चांडक यांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणामध्ये मनसे आमदार नितीन भोसले यांच्यासह पाच जणांची नावं होती. मात्र, यातील चौघांनी यापूर्वीच अटकपूर्वी जामीन घेतलाय. चांडक यांनी तो न घेतल्यानं त्यांना अटक झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आला.
अटकेमागे हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप मनसेनं केलाय. भुजबळांकडे अंगुलीनिर्देश करत त्यांच्या दबावामुळे अटक झाल्याचा आरोप मनसे आमदार वसंत गिते यांनी केला आहे. लोकसभा निवडणुका जवळ आल्याने मनसेला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाल्याचे चांडक यांनी म्हटलेय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ



First Published: Thursday, January 16, 2014 - 10:56


comments powered by Disqus