मनसे प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक यांना जामीन

By Surendra Gangan | Last Updated: Friday, January 17, 2014 - 08:11

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
मनसे प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक यांना नाशिकमध्ये सातपूर पोलिसांनी अटक केली होती. त्यांना गुरूवारी जामीन मिळाल्याने त्यांची सुटका झाली आहे.
२००९ च्या विधानसभा निवडणुकांवेळी झालेल्या पोस्टरबाजी प्रकरणी चांडक यांना अटक करण्यात आली. या प्रकरणामध्ये मनसे आमदार नितीन भोसले यांच्यासह पाच जणांची नावं होती. मात्र, यातील चौघांनी यापूर्वीच अटकपूर्वी जामीन घेतला होता. चांडक यांनी तो न घेतल्यानं त्यांना अटक झाल्याचं पोलीस सांगतले.
चांडक यांच्या अटकेमागे हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप मनसेनं केलाय. भुजबळांकडे अंगुलीनिर्देश करत त्यांच्या दबावामुळे अटक झाल्याचा आरोप मनसे आमदार वसंत गिते यांनी केलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ

First Published: Friday, January 17, 2014 - 08:02
comments powered by Disqus