नाशकात झोपी गेलेली मनसे झाली जागी

लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येतेय तसतशी सत्तधारी पक्षातील मंडळी लोकाभिमुख योजना राबविण्याच्या घोषणा करताना दिसतायेत. दिल्लीपासून गल्लीपर्यंत हाच ट्रेंड दिसून येतोय. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणावर टीका करणाऱ्या मनसेनं नाशिक शहाराकडे लक्ष केंद्रित केलंय. गेल्या आठ दिवसांत शहरात घोषणा आणि विकास कामांचा धडाका सुरु करून नाशिककरांच्या नाशिककरांच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न सुरु केलाय.

| Updated: Jan 30, 2014, 06:23 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येतेय तसतशी सत्तधारी पक्षातील मंडळी लोकाभिमुख योजना राबविण्याच्या घोषणा करताना दिसतायेत. दिल्लीपासून गल्लीपर्यंत हाच ट्रेंड दिसून येतोय. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणावर टीका करणाऱ्या मनसेनं नाशिक शहाराकडे लक्ष केंद्रित केलंय. गेल्या आठ दिवसांत शहरात घोषणा आणि विकास कामांचा धडाका सुरु करून नाशिककरांच्या नाशिककरांच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न सुरु केलाय.
राज ठाकरेंनी नाशिकच्या कारकभाऱ्यांची मुंबईत हजेरी घेतल्यानंतर नाशिकमध्ये झोपी गेलेली मनसे एकदम जागी झालीय. आणि नवनवीन घोषणांचा धडाकाच सुरू झालाय. २२ जानेवारीला महापौरांनी गोदाघाट परिसराची पाहणी केली आणि गोदावरी परिसर प्रदूषणमुक्त करण्याचे आदेश दिले. २३ तारखेला मुंबईनाका परिसरातील अतिक्रमणं हटवण्याचे निर्देश जारी झाले.
२७ तारखेला ६ वाजल्यापासून अतिक्रमण निर्मुलन मोहीम सुरू झाली वसंत गीते यांचं संपर्क कार्यालय आमदारांनी स्वतः जमीनदोस्त केलं. त्याचवेळी महापौरांनी शहरातली १२ वाहतूक बेटं सुशोभित करण्याचा निर्णय घेतला. त्यासठी मोफत वीज देण्याची तयारीही दाखवली. महापौरांची ही बैठक पार पडते ना पडते तोच नाशिक शहर `वायफाय` करण्याची घोषणा झाली. त्याच दिवशी संध्याकाळी वीज बचतीचा संदेश देत नाशिकमधले सिग्नल आणि महापालिकेची विभागीय कार्यालयं सौर उर्जेवर सुरु करण्याची घोषणा करण्यात आली.
मनसेनं अचानक कामांचा सपाटा लावल्यामुळं निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच मनसेला जाग आलीय, अशी टीका विरोधकांनी केलीय. तर कामांचा एवढा धडाका पाहून नाशिककरांनाही धक्का बसलाय.
नशिक महापालिकेची सत्ता मिळाल्यापासून गेल्या दोन वर्षांत मनसेचा कारभार थंड राहिलाय. मात्र आता अचानक विकासकामांचा धडाका आणि घोषणांच पाऊस पडू लागलाय. त्यामुळं लोकसभा निवडणुकीचं स्टेशन जवळ दिसू लागल्यानंच मनसेच्या इंजिनानं गती घेतल्याची शहरात चर्चा सुरु झालीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.