नाशिकच्या महापौर, आयुक्तांची खूर्ची जप्त!

Last Updated: Monday, October 14, 2013 - 18:59

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिकचे महापौर आणि आयुक्तांची खुर्ची जप्त करण्यासाठी न्यायालयीन कर्मचारी महापालिकेत पोहोचलेत. खुर्ची जप्त करण्याची मुदत वाढवण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू झालीय.
सातपूर भागातील रस्त्याची स्थिती अत्यंत गंभीर होती. या भागाचा विकास खुंटल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यामुळंच राजेश रॉय यांनी मुंबई उच्च न्यायालयात महापालिकेच्या कारभाराविरोधात याचिका दाखल केली होती. विकास आराखड्यानुसार रस्ता न केल्यानं नागरिकांनी दहा वर्षांपूर्वी कोर्टात याचिका दाखल केली होती.
त्यावर महापौर आणि आयुक्तांची खुर्ची जप्त करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत. महापालिका कामं करत नसेल, तर त्यांच्या खुर्च्या जप्त करा, असा खणखणीत आदेश कोर्टानं दिलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.First Published: Monday, October 14, 2013 - 18:59


comments powered by Disqus
Live Streaming of Lalbaugcha Raja