ऑफिस रॅगिंगला कंटाळून तरुणीची आत्महत्या Nasik- Girl Suicide wearily due to raging in Office

ऑफिस रॅगिंगला कंटाळून तरुणीची आत्महत्या

ऑफिस रॅगिंगला कंटाळून तरुणीची आत्महत्या
www.24taas.com , झी मीडिया, नाशिक

नाशिकच्या सातपूरमध्ये बॉश कंपनीत प्रशिक्षणार्थी असणाऱ्या एका मुलीनं ऑफिसमधल्या रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केलेल्या मुलीचा मृत्यू झालाय. या प्रकरणी पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतलंय.

नाशिकच्या प्रणाली राहणेनं काल आपल्या प्रशिक्षणार्थी सहकार्यांच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केलीये. काल रात्री पावणेनऊ वाजता तिनं हाताची नस कापून मग ओढणीनं गळफास घेण्याचा प्रयत्न केला होता. तिच्यावर हॉस्पिटलमधे उपचार सुरू होते. मात्र अखेरीस आज तिचा मृत्यू झालाय.

आत्महत्येपूर्वी तिनं लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत असह्य मानसिक छळ आणि टोमणे मारणाऱ्या दहा सहकाऱ्यांची नावं त्यात तिनं लिहून ठेवली आहेत. यात सहा मुली आणी चार मुलांचा समावेश आहे. बहुतांशी याच कंपनीतील कर्मचाऱ्यांची मुलं नोकरीला लागावीत यासाठी बाहेरील असलेल्या प्रणालीला सोडून जाण्यासाठी त्रास दिला जात होता, असं तिनं चिठ्ठीत लिहिलंय.

त्यानुसार पोलिसांनी भूषण परदेशी, अभिजित भोर, विशाल कोरडे, अमित पवार, स्वप्नील सोनवणे, श्वेता शिंदे, तेजस्वीनी बिरारी, शुभदा काजळे, नेहा सोनवणे, हर्षल पाटील यांना संशयावरून ताब्यात घेतलंय.

दहावीनंतर थेट प्रशिक्षण देत नोकरीत सामावून घेणाऱ्या कोर्समध्ये प्रणाली शिकत होती. या कोर्समध्ये सर्व परिक्षांमध्ये अव्वल येणारी प्रणाली आता जर्मनीला जाणार होती. याची असूया सर्व मुलांमध्ये असल्यानं तिचा छळ केला जात असल्याचा आरोप तिच्या पालकांनी केलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, September 03, 2013, 12:12


comments powered by Disqus