सुरेश जैन यांना पुन्हा जमीन नाकारला

जळगाव घरकूल घोटाळ्याप्रकरणी आमदार सुरेश जैन यांचा जामीन पुन्हा फेटाळण्यात आलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 9, 2013, 05:57 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, जळगाव
जळगाव घरकूल घोटाळ्याप्रकरणी आमदार सुरेश जैन यांचा जामीन पुन्हा फेटाळण्यात आलाय. जिल्हा सत्र न्यायालयानं सुरेश जैन यांच्यासह घरकूल घोटाळ्यातले आरोपी असेलेले प्रदीप रायसोनी आणि जगन्नाथ वाणी या दोघांचाही जामीन नामंजूर करण्यात आलाय.
सत्र न्यायालयानं जैन यांचा तिस-यांदा जामीन फेटाळलाय. यापूर्वी जैन यांचा सुप्रीम कोर्टानं चारवेळा आणि औरंगाबाद खंडपीठानं दोन वेळा जामीन नामंजूर केलाय. जळगाव पालिकेच्या 29 कोटी 59 लाखांच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी जैन यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
न्यायालयाने पुन्हा त्यांचा जामीन फेटाळलाय. बहुचर्चित घरकूल गैरव्यवहार प्रकरणात तत्कालीन नगराध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्यासह बिल्डर आणि अनेक नगरसेवकांवर गुन्हे दाखल झालेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.