चांगला रस्ता दाखवा, पाच लाख रुपये मिळवा!

By Jaywant Patil | Last Updated: Monday, July 22, 2013 - 21:01

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिक शहरात आता चांगला रस्ता दाखवा आणि पाच लाख रुपये मिळवा, अशी घोषणा माजी महापौर दशरथ पाटील यांनी केली आहे. गेल्या सहा वर्षात महापलिकेने १८७ कोटी रुपयांचा खर्च रस्त्यांसाठी केलाय. हे पैसे गेले कुठे, का प्रश्न नाशिककर विचारतायत.
महापालिकेच्या मुख्यालयापासून काही अंतरावर असलेला रस्ता जूनच्या दुस-या आठवड्यात पाऊस पडत असताना घाईघाईनं हा रस्ता तयार केला आणि अवघ्या दीड महिन्यात या रस्त्यावर खड्डे पडलेत.. .नाशिकमधल्या अनेक रस्त्यांची हीच कथा आहे.... खड्डे बुजवून नाटकं करण्यापेक्षा आणि पुन्हा डिफर पेमेंट घेऊन काम करण्यापेक्षा आहे ते काम नीट होत नाहीय. माजी महापौर दशरथ पाटील यांनी तर खड्डामुक्त रस्ता दाखवा आणि पाच लाख रुपये मिळवा, अशी घोषणा करत महापालिकेला आव्हान दिलंय.
महापालिकेनं गेल्या सहा वर्षांत रस्त्यांसाठी जवळपास १८७कोटींची तरतूद केलीय. नाशिक महापालिकेचा हा अवाढव्य खर्च पाण्यात गेला का, असा सवाल नाशिककर करतायत. महापौरांनी नेहमीप्रमाणे लवकरात लवकर खड्डे बुजवण्याचे आदेश दिलेत.
एकूणच काय आता खड्ड्यांवरुन मनसे पुन्हा अडचणीत आलीय. नवनिर्माणाची स्वप्नं दाखवणा-या मनसेनं नाशिककरांचा साधा प्रवासही सुखकर केलेला नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, July 22, 2013 - 21:01
comments powered by Disqus