नाशिक जेलमध्ये कैद्यांची हाणामारी, एकाचा मृत्यू

By Surendra Gangan | Last Updated: Wednesday, October 16, 2013 - 15:51

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिकमधील सेंट्रल जेलमध्ये दोघा कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. ही हाणामारी एका कैद्याच्या जीवावर बेतली. हाणामारीत एका कैद्याचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या जखमी कैद्याला रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
नाशिकच्या जेलमध्ये बुधवारी मध्यरात्री काही कैदयांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत विशाल बाळासाहेब चौधरी या कैद्याचा मृत्यू झाला तर दुसरा कैदी विजय रमेश इप्पर गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर जेलमधील सुरक्षाचे काय, अशी चर्चा होत आहे.
कैदी सोपान सुदाम पगारे याच्या वहीतले एक पान फाडल्यावरुन हा वाद झाल्याचे सांगितले जात आहे. या वादावरून विशाल चौधरी आणि विजय इप्पर यांच्याशी सोपान याचा वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. सोपान याने विशाल आणि विजय यांना मारहाण केली. हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या विशाल या कैद्याचा काही वेळात मृत्यू झाला. तर जखणी विजयला मुंबईच्या जे.जे.रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.First Published: Wednesday, October 16, 2013 - 15:47


comments powered by Disqus