राज ठाकरेंचा हातोडा, पण आयुक्तांचे पेव्हरलाच फेवर

खड्डे पेव्हरब्लॉकनं कसले बुजवता, असं म्हणत राज ठाकरेंनी मुंबईत परवाच म्हंटलं.... त्यांच्या या विधानाला दोन दिवसही उलटले नाहीत..... तोच खड्डे बुजवण्यासाठी पेव्हरब्लॉकच उत्तम, असं सर्टिफिकीट दिलंय मनसेचीच सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेच्या आयुक्तांनी..

प्रशांत जाधव | Updated: Aug 16, 2013, 08:37 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
खड्डे पेव्हरब्लॉकनं कसले बुजवता, असं म्हणत राज ठाकरेंनी मुंबईत परवाच म्हंटलं.... त्यांच्या या विधानाला दोन दिवसही उलटले नाहीत..... तोच खड्डे बुजवण्यासाठी पेव्हरब्लॉकच उत्तम, असं सर्टिफिकीट दिलंय मनसेचीच सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेच्या आयुक्तांनी..... त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे.... राजसाहेबांची सत्ता असलेल्या नाशिकमध्ये पेव्हरब्लॉकनंच खड्डे बुजवले जातायत......
पेव्हरब्लॉक बसवायला विरोध असल्याचं याहीआधी राज ठाकरेंनी अनेकवेळा ठणकावून सांगितलंय.... त्यावरून इतर पक्षांना टार्गेट केलं.... आता त्यांचीच सत्ता असलेल्या नाशिकमधले रस्ते पाहुयात.. नाशिकमधले बहुतांश रस्ते पेव्हरब्लॉकनं बुजवले जातायत. जास्त लांबचं उदाहरण कशाला....
अगदी मनसेचं कार्यालय असणा-या राजगडजवळच्या रस्त्यावरचे खड्डेही पेव्हरब्लॉकनंच बुजवण्यात आलेत. त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे पावसाळ्यात खड्डे बुजवायला पेव्हरब्लॉक चांगला पर्याय असल्याचं सर्टिफिकीट मनसेचीच सत्ता असणा-या महापालिकेचे आयुक्त संजय खंदारे यांनी दिलंय.
खड्ड्यांची जबाबदारी झटकून मोकळे झालेल्या राज साहेबांनी त्याचं खापर शिवसेनेवर फोडलं. त्यामुळे शिवसेना नेतेही चांगलेच आक्रमक झालेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून राज ठाकरेंची स्वारी नाशिकला आलेली नाही. नाशिकमधले मनसेचे शिलेदारही त्यांना महापालिकेच्या कामाची नीट माहिती देत नसतील कदाचित... त्यामुळेच नाशिकमधले खड्डे पेव्हरब्लॉकनंच बुजवले जात असल्याची माहिती त्यांना मिळाली नसेल..... मुंबईत पेव्हरब्लॉकवरुन खडखडाट करायचा आणि नाशिकमध्ये त्याच पेव्हरब्लॉकनं खड्डे बुजवायचे..... मग मनसेला इतरांपेक्षा वेगळं का म्हणायचं ?.....

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.