राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर, लोकसभेची चाचपणी

By Surendra Gangan | Last Updated: Wednesday, September 4, 2013 - 10:48

www.24taas.com , झी मीडिया, नाशिक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या नाशिक दौ-यावर आहेत. या दौ-यात ते काही विकासकामांचं उदघाटन करणार आहेत. तर लोकसभेच्या उमेदवारांची चाचपणी करणार असल्याचे बोलले जात आहे.
गंगापूर धरणाचं जलपूजन करत या दौ-याची सुरूवात होणार आहे. नाशिकमध्ये ते विविध विकासकामांची पाहाणी करणार आहेत. नाशिक महापालिका मनसेच्या ताब्यात आहे. विविध वॉर्डातून फिरून ते विकास कामांचा आढावा घेणार आहेत.
जळगावातील विजयी नगरसेवकांचा सत्कार आणि लोकसभेच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची चाचपणी केली जाणार आहे. एकूणच शहरातील विकास कामांबाबत मनसेवर टीका होत असतांना राज ठाकरे यांचा हा दौरा महत्वपूर्ण ठरणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Wednesday, September 4, 2013 - 09:34
comments powered by Disqus