राज ठाकरेंच्या `ड्रिम प्रोजेक्ट`साठी रिलायन्सचा हात!

By Shubhangi Palve | Last Updated: Saturday, October 5, 2013 - 19:24

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बहुचर्चीत गोदापार्कच्या मार्गातले अडथळे दूर करून त्याचा प्रवास पुन्हा सुरू करण्याचा निर्धार राज ठाकरे यांनी केलाय.
‘रिलायन्स फाऊंडेशन’च्या माध्यमातून गोदापार्कचा विकास केला जाणार आहे. या प्रकल्पामागची संकल्पना काय आहे, याचं प्रेझेन्टेशन राज ठाकरेंनी यावेळी स्वतःचं केलं.

एकूण १३.५ किलोमीटर लांबीचा गोदापार्क प्रकल्प असणार आहे. प्रायोगिक तत्वावर पाचशे मीटरचा विकास केला जाणार आहे. यासाठी गंगापूर गाव ते होळकर पुलापर्यंतचा भाग निवडण्यात आलाय. विकासासाठी काही ठिकाणी भूसंपादन करावं लागणार आहे. अम्य़ुझमेंट पार्क, वॉटर स्पोर्टस्, लेझर शो, फ्लॉवर गार्डन, असे प्रोजेक्ट यात आहेत.

व्हिडिओ पाहा :

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, October 5, 2013 - 19:24
comments powered by Disqus