पाकिस्तानी जेलमध्ये चांगली वागणूक मिळाली - सीताबाई Seetabai talks about pakistani jail

पाकिस्तानी जेलमध्ये चांगली वागणूक मिळाली - सीताबाई

पाकिस्तानी जेलमध्ये चांगली वागणूक मिळाली - सीताबाई
www.24taas.com, झी मीडिया, जळगाव

पाच वर्षांपूर्वी जळगावातील वलठाण गावातून बेपत्ता झालेल्या सीताबाई सोनवणे पाकिस्तानच्या जेलमधून परतल्या आहेत. 5 वर्षांनंतर सीताबाई घरी सुखरुप परतल्यात.

पाकनं काही दिवसांपूर्वी सुटका केलेल्या भारतीय कैद्यांमध्ये सीताबाई यांचा समावेश होता.. मनोरुग्ण अवस्थेत असताना सीताबाई 5 वर्षापूर्वी अमृतसर एक्सप्रेसनं सीमेपार गेल्या होत्या.. त्यामुळं पाकनं त्यांना कैद करुन जेलमध्ये टाकलं.. मनोरुग्ण असलेल्या सीताबाईंवर पाक सरकारनं उपचार केले. उपचारानंतर सीताबाईंना घरच्या मंडळींच्या गोष्टी आठवू लागल्या आणि त्याबाबत त्यांनी पाक सरकारला माहिती दिली. भारतीय दूतावासामार्फत सीताबाईंची माहिती मिळवण्यात आली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी पाकनं सुटका करण्यात आलेल्या कैद्यांमध्ये सीताबाईंचा समावेश होता.

गावात परतल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी नातेवाईकांनी गर्दी केलीय. यावेळी पाकिस्तानकडून चांगली वागणूक मिळाल्याचं सीताबाईंनी सांगितलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, July 14, 2013, 23:30


comments powered by Disqus