नाशिकमध्ये 5 वर्षीय मुलीवर सावत्र पित्याचा अत्याचार

By Aparna Deshpande | Last Updated: Wednesday, October 16, 2013 - 09:23

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर सावत्र पित्यानं अत्याचार केल्याची संतापजनक घटना नाशिकमध्ये घडलीय. नाशिकच्या श्रीरंग नगरमध्ये दोन दिवसापूर्वी हा प्रकार घडलाय.
मुलीच्या आईनं दुसरं लग्न केल्यानंतर तिचा सावत्र पिता चिमुरीडला रोज मारझोड करायचा. मात्र दोन दिवसांपूर्वी घरात कुणी नसताना नराधमानं चिमुरडीवर अत्याचाराची परिसीमा गाठली. तिच्या अंगावर ब्लेडनं वार करून तिला गंभीर जखमी केलं.
मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर सावत्र पित्याला पोलिसात हजार करण्यात आलं होतं. मात्र पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल न घेता संशयिताला सोडून दिलं. त्यानंतर मात्र या मुलीची आई आणि आरोपी सावत्र पिता फरार असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, October 16, 2013 - 09:23
comments powered by Disqus