स्वाती चिखलीकरचा जामीन अर्ज फेटाळला

By Shubhangi Palve | Last Updated: Friday, May 10, 2013 - 20:30

www.24taas.com, नाशिक
सार्वजनिक बांधकाम विबागातील लाचखोर अभियंता सतीश चिखलीकर याची पत्नी स्वाती चिखलीकर हिच्या अटकेचा मार्ग मोकळा झालाय. स्वातीचा अटकपूर्व जामीन नाशिक कोर्टानं नामंजूर केलाय.
लाचखोरी प्रकरणातलं गांभीर्य लक्षात घेता कोर्टानं स्वातीचा अटकपूर्व जामीन फेटाळलाय. चिखलीकरचं बिंग फुटल्यानंतर त्याची मालमत्ता ठिकाणावर लावण्यात स्वाती सक्रिय झाली होती. मात्र, सध्या स्वाती तपासात सहकार्य करत असल्यानं तिला अटक करण्याचा विचार नाही, असं पोलिसांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, लाचखोर सतीश चिखलीकर आणि जगदीश वाघ यांना १६ मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. काळा पैसा आणि किलो-किलोनं सोनं मिळत असल्याने चिखलीकरची पोलीस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी विनंती एसीबीनं केली होती. ही विनंती ग्राह्य धरत कोर्टानं चिखलीकर आणि वाघ या दोघांच्या पोलीस कोठडीत १६ मेपर्यंत वाढ केलीय. राज्यातील विविध ठिकाणी असलेली बँकेतील संपत्ती आणि जमीनजुमला तपासून पाहण्यासाठी पोलीस कोठडी वाढवून देण्यात अली आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 10, 2013 - 20:30
comments powered by Disqus