स्वाती चिखलीकरच्या लॉकर्समध्ये ९ किलो सोनं

नाशिममधील सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता यांच्याकडे कोट्यवधीची बेहिशोबी संपत्ता सापडली. अभियंता सतीश चिखलीकर आणि वाघ यांना अटक करण्यात आलेय. स्वाती चिखलीकर हिच्या नगर जिल्ह्यातल्या बँक लॉकर्समध्ये अंदाजे सव्वातीन कोटींची मालमत्ता सापडलीये.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 9, 2013, 07:12 PM IST

www.24taas.com,झी मीडिया, नाशिक
नाशिममधील सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता यांच्याकडे कोट्यवधीची बेहिशोबी संपत्ता सापडली. अभियंता सतीश चिखलीकर आणि वाघ यांना अटक करण्यात आलेय. स्वाती चिखलीकर हिच्या नगर जिल्ह्यातल्या बँक लॉकर्समध्ये अंदाजे सव्वातीन कोटींची मालमत्ता सापडलीये.
स्वाती चिखलीकरचे शेवगावातल्या मर्चंट बँकेत ४ लॉकर्स आहेत. यातले २ लॉकर्स उघडण्यात आलेत. त्यात ९ किलोपेक्षा जास्त सोनं, 5 किलो चांदी आणि ५७ लाख रोख सापडलेत. या सोन्याची किंमत अंदाजे २ कोटी ६७ लाख रुपये आहे.
दरम्यान, स्वाती चिखलीकर तपासात सहकार्य करत असल्यामुळे सध्यातरी तिला अटक करण्याची गरज नसल्याचं एसीबीचं म्हणणं आहे. तिच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर येत्या ८-१० दिवसांत तिला अटक होऊ शकते.
लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर सतीश चिखलीकरकडे करोडोंची बेनामी संपत्ती सापडलीय. त्यामुळे खलीकरभोवती ‘अँन्टी करप्शन ब्युरो’ची पकड आता घट्ट होत चाललीय. आपली प्रचंड संपत्ती लपवण्यासाठी चिखलीकरने वापरलेले सर्व मार्ग एसीबी उध्वस्त करतेय.

लाच प्रकरणी बुधवारी नगर जिल्ह्यातील शेवगावमधील एका सहकारी बॅंकेवरही एसीबीनं छापा मारण्यात आला. या छाप्यातून अनेक धागेदोरे समोर आल्याचं समजतंय. या प्रकरणी स्वाती चिखलीकरच्या लॉकर्सचीही कसून तपासणी करण्यात आली.
एका सार्वजनिक बांधकाम विभागातील इंजिनिअरकडे एवढी संपत्ती असेल तर पीडब्लूडीच्या मंत्र्याकडे किती संपत्ती असेल?, या राज ठाकरेंच्या प्रश्नाला उत्तर देताना छगन भुजबळ यांनी या प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी ढकलली होती. परंतू, सार्वजनिक बांधकाम विभागात सर्वच जण भ्रष्टाचारी आहेत असा दावा चिखलीकरनं केल्यानं याची जबाबदारी भुजबळांची नसेल तर कुणाची आहे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.