नागमण्याच्या नावाखाली विकला काचेचा मणी!

नागमण्याच्या नावाखाली काचेचा मणी देऊन पंजाबी व्यापा-याची दहा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार जळगावात उघड झालाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 4, 2013, 05:55 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, जळगाव
नागमण्याच्या नावाखाली काचेचा मणी देऊन पंजाबी व्यापा-याची दहा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार जळगावात उघड झालाय.
या प्रकरणी मुक्ताईनगरमधल्या दोघा जणांना सापळा रचून अटक करण्यात आलंय. सोनू पावरा आणि शिवराम भोसले असं या आरोपींच नाव आहे. त्यांनी सुरेंद्रसिंग गुरया या पंजाबी व्यापा-याची फसवणूक केल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणात मुक्ताईनगर पोलीस पुढचा तपास करत आहेत.
नागमणी हे दुर्मीळ रत्न विकण्याच्या नावाखाली व्यापाराची फसवणूक करण्यात आली. हे रत्न अत्यंत प्रभावी असल्याचं सांगण्यात येतं. मात्र प्रत्यक्षात हे रत्न कुणीही पाहिलेलं नाही. अशाच रत्नाच्या नावाखाली काचेचा मणी विकून सुरेंद्र सिंग यांची फसवणूक करण्यात आली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.