'असभ्य' आमदाराला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा!

टोलनाक्यावर महिलांना अर्वाच्य शिविगाळ करणा-या आमदार अनिल कदम यांना उद्धव ठाकरे यांनी पाठिशी घातलंय. शिवसेनेच्या संस्कृतीचा दाखला देत त्यांनी अनिल कदम यांची तळी उचलून धरली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 25, 2013, 06:54 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिकचे आमदार अनिल कदम यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अनिल कदम यांच्याविरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. धमकावणे, शिवीगाळ करणे आणि नुकसान करणे असे गुन्हे अनिल कदम यांच्याविरोधात दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळं अनिल कदम यांना अटक होण्याची शक्यता आहे.
टोलनाक्यावर महिलांना अर्वाच्य शिविगाळ करणा-या आमदार अनिल कदम यांना उद्धव ठाकरे यांनी पाठिशी घातलंय. शिवसेनेच्या संस्कृतीच्या दाखला देत त्यांनी अनिल कदम यांची तळी उचलून धरली आहे. एवढंच नाही, तर महिलांना शिविगाळ करणारे, आणि ज्यांच्याविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय अशा आमदार कदम यांना कुटुंबवत्सल असल्याचं सर्टिफिकेट उद्धव ठाकरे यांनी दिलंय.
पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर कदम यांनी महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली होती. महिला कर्मचाऱ्यांचे कपडे काढण्याची गलिच्छ धमकी देत त्यांनी शाब्दिक बलात्कार केला होता. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उडाली होती. आज त्यांनी आपला राजीनामा पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.